निधीअभावी निरूद्योगी ठरू शकतो ‘उद्योग दिन’
By Admin | Updated: January 31, 2015 00:53 IST2015-01-31T00:53:49+5:302015-01-31T00:53:49+5:30
राज्यातील औद्योगिक विकास महामंडळांकडे निधीची तरतूदच नाही.

निधीअभावी निरूद्योगी ठरू शकतो ‘उद्योग दिन’
राजेश शेगोकार / बुलडाणा:
राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात ह्यउद्योग दिनह्ण साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने घेतला आहे. मंगळ्वार, २७ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, उद्योग जगताला एका व्यासपीठावर आणण्यासाठी, १ फेब्रुवारी रोजी विश्वकर्मा जयंतीदिनी विविध कार्यक्रम व प्रदर्शनांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत; मात्र यासाठी कुठल्याही निधीची राज्यभरात तरतूद करण्यात आलेली नाही. पश्चिम वर्हाडातील तीनही जिल्ह्यात या दृष्टिकोनातून एकही कार्यक्रम आयोजित केला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून, ह्यउद्योग दिनह्ण हा कार्यक्रमाअभावी निरोद्योगी ठरू शकतो.
महाराष्ट्र शासनाने २0१३ मध्ये जाहीर केलेल्या औद्योगिक धोरणानुसार, राज्याचा औद्योगिक विकास घडवून, आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी नवीन उद्योग घटकांच्या स् थापनेला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे.
नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांना त्यांची उत्पादने व क्षमतांचे प्रदर्शन घडविता यावे, यासाठी सामाईक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शानसाने घेतला आहे.
प्रत्येक जिल्यात असे व्यासपीठ वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विश्वकर्मा जयंतीदिनी प्रत्येक जिल्ह्यात ह्यउद्योग दिनह्ण साजरा करण्याचे निर्देश उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिले आहेत; मात्र कुठेही कार्यक्रम होणार नसल्याने उद्योग दिन निरोद्योगीच ठरण्याची शक्यता अधिक आहे.