शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वनशेती उप-अभियानाबाबत उदासीनता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:50 IST

बुलडाणा : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी विभाग व वन विभाग या अभियानापासून अनभिज्ञता दाखवत असल्याने वन शेतीसाठी प्रशासकीय पातळीवरच उदासीनता दिसून येत आहे.  

ठळक मुद्देशेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्याचा उपक्रम वन, कृषी विभाग अनभिज्ञ

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी विभाग व वन विभाग या अभियानापासून अनभिज्ञता दाखवत असल्याने वन शेतीसाठी प्रशासकीय पातळीवरच उदासीनता दिसून येत आहे.  शेती उत्पादन व वृक्ष लागवड वाढविण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनाबरोबरच वृक्ष लागवड वाढविण्यावर भर देणारे वन शेती अभियान हाती घेण्यात आले आहे. वन शेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान उपयुक्त असून, यासाठी शेतकर्‍यांना आलेल्या खर्चाच्या ५0 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अभियानामुळे वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीचा झालेला शेती व्यवसाय शाश्‍वत करण्यासह शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ करणे फायद्याचे होणार आहे. वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांचे संवर्धन होऊन वातावरणातील बदल काही प्रमाणात सौम्य होऊ शकते. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार राबविण्यात येणार्‍या वन शेती अभियानाची अंमलबजावणी व नियोजनामध्ये कृषी आणि वन विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ, रोजगाराच्या संधी, उत्पन्न आणि उपजीविकेचे साधन निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वन शेती अभियानाची कुठलीच अंमलबजावणी हाती घेण्यात आलेली नाही.  त्यामुळे हे अभियान कागदावरच राबविण्यात येते की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. या अभियानासाठी कृषी विभागाची महत्त्वाची जबाबदारी असतानाही कृषी विभागाकडून यासाठी वन विभागाकडे बोट दाखविल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना महत्त्वाकांक्षी असलेल्या वन शेती अभियानापासून वंचित रहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

सॉइल हेल्थ कार्ड आवश्यकवन शेती  अभियानांतर्गत शेतीमध्ये कुठल्या प्रकारचे रोप लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते, यासाठी सॉईल हेल्थ कार्ड पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या अभियानाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे सॉईल हेल्थ कार्ड असणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास तातडीने कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांवर देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ३0 हजार सॉईल हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात अंमलबजावणीच नाही!केंद्र शासनाने वन शेती अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे. सदर अभियान सन २0१७-१८ साठी असतानाही अद्याप जिल्ह्यात कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी सुरू झाली नाही. यात वन विभाग व कृषी विभागाचा समन्वय महत्त्वाचा आहे; परंतु या दोन्ही विभागामध्ये  अभियानाविषयी निरुत्साह दिसून येत आहे. 

सॉईल हेल्थ कार्ड महत्त्वाचे असल्याने वन शेती अभियान हे कृषी विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान आहे. अंमलबजावणी व नियोजनामध्ये वन विभागाचा सहभाग राहणार आहे. - एस.एन.लांडे, वन अधिकारी, सामाजिक वनीकरण बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीforestजंगल