टायर फुटल्याने इंडिकाला अपघात
By Admin | Updated: May 12, 2015 00:09 IST2015-05-11T23:59:01+5:302015-05-12T00:09:41+5:30
मेहकर बायपास पुलावरून इंडिका गाडी खाली कोसळली; चार जण जखमी.

टायर फुटल्याने इंडिकाला अपघात
मेहकर (जि. बुलडाणा) : मेहकर येथून सुलतानपूरकडे जाणार्या इंडिका गाडीचा टायर फुटल्याने मेहकर बायपासवरील पुलावरून गाडी खाली कोसळली. यात इंडिकातील चार जण जखमी झाल्याची घटना ११ मे रोजी सांयकाळी ५.३0 वाजेच्या सुमारास घडली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील रहिवासी काशिनाथ राठोड (४५), उज्ज्वला राठोड (४0), अनिकेत राठोड (३६) आणि मनीषा राठोड हे सर्व एम.एच २0 पी.एच ६४३३ क्रमांकाच्या इंडिका गाडीने मेहकर येथून सुलतानपूरकडे जात होते; मात्र या दरम्यान अचानक रस्त्यावर त्यांच्या गाडीचा टायर फुटला. यामुळे चालकाचा गाडीवरील संतुलन बिघडून गाडी मेहकर बायपासवरील पुलावरून खाली कोसळली. यामध्ये गाडीतील चारही जण गंभीर जखमी झाले. परिसरतील नागरिकांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी राठोड कुटुंबीयांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.