Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By सदानंद सिरसाट | Updated: October 17, 2023 17:18 IST2023-10-17T17:18:32+5:302023-10-17T17:18:50+5:30
Buldhana: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- सदानंद सिरसाट
जळगाव जामोद (बुलढाणा) - भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. त्यांना वायुदलाच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृतघोषित केले.
जळगाव जामोद वाडी खुर्द येथील पेट्रोलपंपामागे रहिवासी असलेले माजी सैनिक दिलीपराव देशमुख व मुख्याध्यापक रेखा दिलीपराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव मिथील भारतीय वायुसेना बंगळुरू येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत होते. भारतीय वायुसेनेत २०११ पासून त्यांनी सेवा दिली. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वायुदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृतघोषित करण्यात आले. मिथिल यांच्यावर उद्या १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हिंदू स्मशानभूमी, वाडी खु. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिथिल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ आदी आप्तेष्ट आहेत.