सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ!

By Admin | Updated: August 3, 2016 00:15 IST2016-08-03T00:15:56+5:302016-08-03T00:15:56+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पात वाढ; जिल्ह्यात सरासरी ५१६.२ मि.मी. पावसाची नोंद.

Increase in water resources in irrigation projects! | सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ!

सिंचन प्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ!

बुलडाणा: गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम, तर कधी दमदार स्वरुपाच्या पावसामुळे शेतातील आंतर मशागतीची कामे खोळंबली आहेत. सोमवारीही जिल्ह्यात सिंदखेड राजा व नांदुरा तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र संततधार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणी पातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपयर्ंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात जास्त २१ मि.मी. पावसाची नोंद बुलडाणा तालुक्यात करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस मेहकर येथे २१ मि.लि पडला आहे. तसेच चिखली तालुक्यात २0 मिमी, मेहकर तालुक्यात १९ मिमी, संग्रामपूर तालुक्यात ११ मिमी, शेगाव तालुक्यात ९ मिमी, मलकापूर तालुक्यात ९ मिमी, जळगाव जामोद तालुक्यात ६ मिमी, लोणार तालुक्यात ४ मिमी, मोताळा तालुक्यात ४ मिमी, खामगाव तालुक्यात २.२ मिमी, देऊळगाव राजा तालुक्यात २ मिमी, सिंदखेडराजा तालुक्यात निरंक, नांदुरा तालुक्यात निरंक पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात एकूण १0७.0२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ८.२ मि.मी आहे. आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस सिंदखेडराजा तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस संग्रामपूर तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जून २0१६ पासून आतापयर्ंत पडलेल्या पावसाची सरासरी ५१६.२ मि.मी. आहे. बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये गत २४ तासात झालेल्या पावसामुळे जलसाठय़ांमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Increase in water resources in irrigation projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.