गैरसोयीमुळे विद्यार्थिनींचे हाल

By Admin | Updated: September 25, 2014 01:15 IST2014-09-25T01:04:34+5:302014-09-25T01:15:23+5:30

सिंदखेडराजा बसस्थानकावर सुविधांचा अभाव.

Inconvenience to students | गैरसोयीमुळे विद्यार्थिनींचे हाल

गैरसोयीमुळे विद्यार्थिनींचे हाल

सिंदखेडराजा : येथील परिवहन महामंडळाच्या आगार प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सिंदखेडराजा ते भोसा मार्गावर ३५0 पासधारक विद्यार्थीनी असून देखील मानव विकासची एकही बस गाडी नाही. त्यामुळे विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बसगाडी नसल्यामुळे शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे. तर सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर १८५ पासधारक विद्यार्थीनींचे गाडी अभावी हाल होत आहेत. शनिवारला तर गाडीच नसते, तरी याबाबत बसस्थानकाचेवतीने वरिष्ठांना अनेकवेळा पत्रव्यवहार केले.
सिंदखेडराजा बसस्थानकावरुन दररोज लांब पल्ल्याच्या नागपूर, मुंबई, गडचिरोली, पुणे, सातारा, ठाणे, पंढरपूर अशा २३0 बसगाड्या १२ तासामध्ये जाणेयेणे करतात. तर मेहकर आगाराच्या फक्त ५ बस गाड्यांच्या दिवसभर फेर्‍या राहतात. सिंदखेडराजा वरुन माळसावरगाव, नशिराबाद, अंचली, दरेगाव, वसंतनगर, डावरगाव, धांदरवाडी, दत्तापूर, शेलु, भोसा या गावामधील ३५0 विद्यार्थीनी व विद्यार्थी, पासधारक असून मानव विकास यंत्रणेची एकही बसगाडी नाही. इतर बसगाड्या सकाळी ७, ८.३0, ९.४५ वाजता आहे. परंतु शाळेच्या वेळेवर विद्यार्थीनी व प्रवाशी प्रचंड गर्दीमुळे असंख्य विद्यार्थी जागा नसल्यामुळे शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर सावखेड तेजन, हनवतखेड, माहेरखेड, सुलजगाव, वडाळी, वाघुरा, खामगावखापरखुटी ही गावे असून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थीनींची संख्या १८५ असून मानव विकासची एकच बसगाडी आहे. इतर बसगाड्या सकाळी ६.१५, ८.४५, १0.३0, ९ वाजता फेर्‍या मारतात. १८५ पासधारक व प्रवाशी गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहे.

Web Title: Inconvenience to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.