वारकरी महामंडळाच्या महिला शाखेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:47+5:302021-09-12T04:39:47+5:30
यावेळी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे युवा नेते ऋषी जाधव, तसेच गुरुपीठाधीश देवदत्त महाराज पितळे, तालुकाध्यक्ष संतोष महाराज ...

वारकरी महामंडळाच्या महिला शाखेचे उद्घाटन
यावेळी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे युवा नेते ऋषी जाधव, तसेच गुरुपीठाधीश देवदत्त महाराज पितळे, तालुकाध्यक्ष संतोष महाराज खडसे आदी उपस्थित हाेते. प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते माधवराव जाधव यांनी दर वर्षी न चुकता पंढरपूर वारी आम्ही करतो, असे सांगितले. गुरुपीठाधीश श्री देवदत्त महाराज पितळे (ज्ञानमंदिर) यांनी वारकऱ्यांच्या प्रथा, परंपरा, तसेच वारकरी संघटन करून भगवंत नामाचा महिमा वाढावा, असे सांगितले. व्यासपीठावर हभप सुभाष पीटकर, वामनराव दळवी, आल्हाट महाराज, माजी सभापती माळेकर, गणेश अण्णा लष्कर, त्रंबक भांडेकर हे मान्यवर उपस्थित होते. सर्व वडारपुरा नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यास तसेच तालुक्यातील अन्य नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वडारपुरा शाखेच्या महिला अध्यक्ष अक्काबाई मुदळकर, उपाध्यक्ष सुलाबाई पिटकर, इतर पदाधिकाऱ्यांस मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली. सर्व वडारपुरावासीयांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.