बुलडाणा येथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन.

By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-20T23:38:26+5:302014-09-21T00:38:54+5:30

राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आठ महसूल विभागातून २७0 खेळाडू, ५0 पंच अधिकारी सहभागी.

Inauguration of state-level school table tennis competition at Buldhana | बुलडाणा येथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन.

बुलडाणा येथे राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन.

बुलडाणा : राज्यस्तरीय स्पर्धेत खेळताना देशपातळीवर राज्याचे नाव करण्यासोबतच राष्ट्रीय व आं तरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे ध्येय ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष किरण कुरूंदकर यांनी केले.
बुलडाणा येथील क्रीडा नगरी परिसरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात १४, १७, १९ वर्षाआतील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक मुख्य कार्यकारी अधिकारी अभियंता बाळासाहेब ठेंग होते. प्रमुख अ ितथी म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे विभागीय उपसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे होते.
राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आठ महसूल विभागातून २७0 खेळाडू व ५0 पंच अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यांची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या व तीने करण्यात आलेली आहे.

Web Title: Inauguration of state-level school table tennis competition at Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.