अवैध दारू विक्री धंद्यावर छापा
By Admin | Updated: April 10, 2017 23:51 IST2017-04-10T23:51:54+5:302017-04-10T23:51:54+5:30
बुलडाण्यात कारवाई; देशी दारूसह ५२00 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
_ns.jpg)
अवैध दारू विक्री धंद्यावर छापा
बुलडाणा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महामागार्पासून ५00 मीटर अंतराचे आंत असणार्या मद्य विक्री अनुज्ञप्त्या जिल्हाधिकार्यांनी ३१ मार्च २0१७ रोजी आदेशानुसार बंद केल्या. त्यामुळे जिल्ह्यात अवैध दारू धंद्यामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक एल.एस. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जांब शिवारात अवैध दारू विक्री धंद्यावर छापा टाकण्यात आला. छापा निरीक्षक विलास पाटील, रामेश्वर सोभागे, अमोल अवचार, अमोल सुसरे यांच्या भरारी पथकाने टाकला. यामध्ये आरोपीच्या ताब्यातून देशी दारूसह ५२00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.