'ऑफर'च्या नावाखाली महत्त्वपूर्ण डेटा जातोय चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:36 IST2021-04-20T12:36:39+5:302021-04-20T12:36:51+5:30

Cyber Crime : विविध प्रकारच्या ऑफर्सच्या नावाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवली जात आहे.

Important data is stolen under the name of offer by internet links | 'ऑफर'च्या नावाखाली महत्त्वपूर्ण डेटा जातोय चोरीला

'ऑफर'च्या नावाखाली महत्त्वपूर्ण डेटा जातोय चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  कोरोनालोकांची माहिती गोळा करण्यासाठी हॅकर्स नवनवीन युक्ती वापरत आहेत. अशाचप्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या ऑफर्सच्या नावाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून मोबाईलमधील प्रायव्हेट डाटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
काही दिवसांपासून फ्री मुव्हीज, आयपीएल ऑफर, काही नामवंत चॅनलचे दोन महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन आदी विविध ऑफरच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर लिंक पाठवली जात आहे. या लिंकला क्लिक करताच एक अप्लिकेशन डाऊनलोड होते. अप्लिकेशन डाउनलोड होताच आपल्या व्हॉट्सॲपच्या मदतीने आपण ज्या ग्रुपमध्ये असतो आणि आपल्याकडे ज्या व्यक्तींचे नंबर असतात, त्या सर्वांना या अप्लिकेशनची लिंक आपोआप जाते. 
ही साखळी अशीच सुरू राहते. या अप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाईलचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. सध्या सायबर पोलिसांकडे अशाप्रकारे कुठल्याही व्यक्तीची तक्रार आलेली नाही. 

अशा पद्धतीने ॲप अनइन्स्टॉल करा! 
 मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावून ॲप सेटिंगमध्ये जा. तेथे प्रोफाईल लिस्ट नावाने हे ॲप असेल. या ॲपच्या पुढे डॉट एक्सवायझेड, असे असू शकते. या ॲपला क्लिक केल्यानंतर फोर्स टू स्टॉप आणि क्लियर कॅच करावे. त्यानंतर मोबाईल बंद करून चालू करावा. तरच हे अप्लिकेशन मोबाईलमधून जाते. अन्यथा काही मिनिटांनी ॲपच्या मदतीने मेसेज पुढे फॉरवर्ड होतात.


इंटरनेट वापरकर्त्याचे अनुभव 
 एका ग्रुपवर एकाने ही लिंक टाकली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर ऑनलाईन स्टीम नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड झाले. यानंतर ऑफरबाबतचा मेसेज आणि लिंक आपोआप माझ्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर आणि पर्सनल नंबरवर गेली. अप्लिकेशन डाऊनलोड होताच दोन-तीन मिनिटांसाठी माझा मोबाईल हँग झाला. अप्लिकेशन डिलीट केल्यानंतरही मोबाईल हँग होणे किंवा दुसऱ्यांना मेसेज आपोआप जाण्याची अडचणी येत होती. 

Web Title: Important data is stolen under the name of offer by internet links

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.