चिमुकल्यांना उमगले मतदानाचे महत्व
By Admin | Updated: September 28, 2014 23:14 IST2014-09-28T23:14:13+5:302014-09-28T23:14:13+5:30
मेहकर येथे वेध भविष्याचा या पथनाट्यातून मतदारांना धडे.

चिमुकल्यांना उमगले मतदानाचे महत्व
मेहकर : पुर्वी थोरमोठय़ांचे सांगणे लहानगे एैकायचे. त्यांच्याकडून लहानग्यांना लोकशाहीचे धडेही मिळायचे. परंतु थोरामोठय़ांनाही आता लोकशाही बळकट करण्याचा विसर पडत आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान महत्वाचे असून, चिमुकल्यांनाही आता मतदानाचे महत्व उमगले आहे. भविष्याचा वेध घेऊन चिमुकल्यांनी शहरासह खेड्यापाड्याच्या कानाकोपर्यात जावून पथनाट्याद्वारे मतदारांना धडे देण्यास सुरुवात केली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृती अभियानासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात. एखादे सरकार आणण्याची किंवा ते पाडण्याची ताकद एका मतामध्ये आहे. या मतदानाचे महत्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना पटले असून, भविष्याचा वेध घेऊन त्यांनी मतदार जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. रॅलीद्वारे घोषवाक्ये तसेच संगीत, पथनाट्याच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी गावोगावी जावून मतदारांना मतदानाचे मह त्व पटवून देण्यास सुरुवात केली आहे.