यंदाच्या उत्सवात पाण्यामध्ये खाण्याचा सोडा वापरून घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST2021-09-07T04:41:08+5:302021-09-07T04:41:08+5:30
४८ तासात विरघळते मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती लवकर पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे या मूर्ती प्रदूषणाला धोकादायक असल्याचे सांगण्यात ...

यंदाच्या उत्सवात पाण्यामध्ये खाण्याचा सोडा वापरून घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन
४८ तासात विरघळते मूर्ती
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती लवकर पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे या मूर्ती प्रदूषणाला धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा वापरल्यास साधारणत: ४८ तासांत मूर्ती विरघळते. पण हे मोठ्या मूर्तीसाठी उपयुक्त नसून केवळ दीड फुटाच्या मूर्तीसाठी योग्य ठरू शकेल.
पीओपीला पसंती
पीओपीच्या मूर्ती आकर्षक असल्याने दरवर्षी त्या मूर्तींना वाढती मागणी आहे. कमीत कमी किमतीत मोठ्या मूर्ती मिळत असल्याने या मूर्ती खरेदी करण्यावर सर्वांचा भर असतो. मातीच्या मूर्तीचे दर जास्त असल्याने याकडे नागरिकांचा कमी कल आहे. यामुळे या वर्षीदेखील दरवर्षीप्रमाणेच पीओपीच्या मूर्तींना मागणी कायम असल्याचे चित्र आहे.
मातीचा दर परवडत नाही
२ फुटांच्या साच्याला साडेतीन हजार मोजावे लागतात. त्यानंतर मातीकाम, फिनिशिंग, रंग याचा ताळमेळ बघता मातीच्या मूर्तीला पीओपीपेक्षा दुप्पट दर असतो. त्यामुळे अनेक जण पीओपीच्या मूर्ती घेतात.
- गजानन तायडे, मूर्तिकार
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
पीओपीची मूर्ती विरघळण्यासाठी खाण्याचा सोडा वापरण्याचा पर्याय पुढे आला आहे. ही मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर ते पाणी खत म्हणून वापरता येऊ शकते.
पीओपीच्या मूर्तीमध्ये काथ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मूर्ती विरघळल्यानंतर त्यातील काथ्या तसाच राहतो. तो झाडांमध्ये टाकल्यास कुजून खत मिळेल.