भारनियमनाच्या वेळेत तत्काळ बदल करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:37 IST2017-10-12T13:36:14+5:302017-10-12T13:37:01+5:30

भारनियमनाच्या वेळेत तत्काळ बदल करा!
बुलडाणा : कोलवड गावाचा विद्युत पुरवठा हतेडी सबस्टेशन येथून होत आहे. सध्याच्या भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ९ आॅक्टोबरपासून लोेडशेडींगची वेळ सायंकाळी ५.४५ ते रात्री ११.४५ अशी करण्यात आली आहे. या वेळेत केलेला बदल त्रासदायक आहे. त्यामुळे साथीचे रोगाचे प्रमाण वाढले असून, मुलांच्या शैक्षणिक समस्या उदभवणार आहेत. त्यामुळे या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.
महावितरणचे अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारनियमनाव्यतिरिक्त ज्या वेळेत विद्युत पुरवठा बंद असतो त्या वेळेचा मोबदला म्हणून आपल्या महावितरण विभागाच्या शासन निर्णयानुसार ५० टक्के बॅकलॉग भरुन देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शाम खडके, दिनकर पाटील, गणेश जाधव, संपत जाधव, कडुबा जाधव, सागर जाधव, प्रकाश जाधव, शंकर जाधव, संजय जाधव, आप्पा साळवंत, विनोद जाधव,केशव जाधव, सोहन राठी, दिनकर बिबे, राजु चव्हाण, राजु वावरे, गजानन गाडेकर, यांच्या सह्या आहेत.