अंढेरा परिसरात वाढले अवैध धंदे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:36+5:302021-07-23T04:21:36+5:30
अवैध रेती वाहतूक, अवैध देशी दारू ठिकठिकाणी खुलेआम विकली जाते. या सर्वांवर कुठलीच कारवाई न करता बिट जमादार यांच्याकडून ...

अंढेरा परिसरात वाढले अवैध धंदे!
अवैध रेती वाहतूक, अवैध देशी दारू ठिकठिकाणी खुलेआम विकली जाते. या सर्वांवर कुठलीच कारवाई न करता बिट जमादार यांच्याकडून सतत पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येते. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले असून जिल्हा प्रशासन कडक अंमलबजावणी करण्यात व्यस्त असते. जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरूच आहे. अंढेरा येथे सायंकाळी चार वाजता स्थानिक बीट जमादार प्रतिष्ठाने बंद करतात. परंतु काही प्रतिष्ठाने सुरूच असल्याने जी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली, त्या मालकांनी २१ जुलै रोजी सायंकाळी होत असलेल्या भेदभावाबद्दल व्यथा मांडली आहे. यासंदर्भात स्थानिक बीट जमादार यांना विचारणा केली असता चार वाजता बस स्टॉपवरील सर्व प्रतिष्ठाने बंद केली. परंतु आम्ही पोलीस स्टेशनमध्ये परतल्यानंतर जर कोणी प्रतिष्ठाने उघडत असतील तर पोलीस काय करणार, असे सांगितले.
प्रत्येक दुकानदारांना वेगवेगळे नियम कसे?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद करण्याचे नियम प्रत्येक दुकानदाराला वेगवेगळे कसे, असा प्रश्न काही स्थानिक दुकानदारांनी उपस्थित केला आहे. पोलिसांकडूनही काही दुकाने वेळेत बंद ठेवण्याबाबत तंबी दिल्या जातात. तर काही दुकाने सुरूच राहतात.
तक्रारकर्त्यांनी मला कुठली व कोणाची प्रतिष्ठाने उघडी आहेत, त्यांची नावे सांगावी मी कारवाई करतो.
- गजानन वाघ, बिट जमादार, अंढेरा