दारूचा अवैध साठा जप्त
By Admin | Updated: October 18, 2014 00:03 IST2014-10-18T00:03:17+5:302014-10-18T00:03:17+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची देऊळगाव धनगर येथे कारवाई.

दारूचा अवैध साठा जप्त
भरोसा (बुलडाणा) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने देऊळगाव धनगर येथे टाकलेल्या छाप्यात देशी, विदेशीसह गावठी दारूचा अवैध साठा जप्त केली. याप्रकरणी प थकाने एकास अटक केली. ही कारवाई १५ ऑक्टोबर रात्री करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव येथे छापा टाकला. तेथे सुरेश ज्ञानबा घुबे दारूची विक्री करताना आढळून आला. यावेळी त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या ४00 पावट्या जप्त करण्यात आल्या. शेळगाव अटोळ शिवारात अवैध हातभट्टी निर्मिती अड्डय़ावर छापा टाकण्यात आला. यात १0 लिटर हातभट्टी दारु, मोहा सडवा बेवारस स्थितीत आढळून आला. या दोन्ही कारवाईत १५ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल ज प्त करण्यात आला. शिवाय आरोविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद १९४९ चे कलम ६५ ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तर आरोपी सुरेश घुबे यास अटक करण्यात आली.