अवैध दारूसह चार लाखांचा माल जप्त
By Admin | Updated: October 14, 2014 00:25 IST2014-10-14T00:25:08+5:302014-10-14T00:25:08+5:30
निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मेहकर पोलिसांची कारवाई.

अवैध दारूसह चार लाखांचा माल जप्त
मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील कळंबेश्वर येथून अवैध दारूसह ३ लाख ९२ हजार ७६0 रु पयांचा माल जप्त केल्याची घटना काल १३ ऑक्टोबर रोजी घडली. कळंबेश्वर येथील अमिनाबी शे. हारुण ही विनापरवाना दारूविक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाड टाकली असता, तिच्याकडे अवैध देशी दारूचा ३ हजार ७६0 रुपयांचा माल आढळला. कळंबेश्वर येथीलच अनंता नारायण अंभोरे व गजानन प्रल्हाद मिसाळ हे इंडिका गाडीने अवैध दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल केशव नागरे यांना मिळाली होती. त्यांनी इंडिका गाडीसह ३ लाख ८९ हजारांचा अवैध दारूचा माल जप्त केला.