अवैध रेतीचे मेटॅडोर पकडले!
By Admin | Updated: March 3, 2017 00:09 IST2017-03-03T00:09:13+5:302017-03-03T00:09:13+5:30
अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे मेटॅडोर महसूल विभागाने पकडून दंडाची कारवाई केली.

अवैध रेतीचे मेटॅडोर पकडले!
खामगाव, दि.३ - अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे मेटॅडोर महसूल विभागाने पकडून दंडाची कारवाई केली. ही घटना नांदुरा रोडवरील सुटाळा बु. शिवारात घडली. मेटॅडोर क्र.एमटिव्ही ५१९१ हे नांदुरा रोडवरून एक ब्रास रेती घेऊन येत असताना तलाठी राहुल चौधरी यांना दिसून आले. त्यांनी मेटॅडोर थांबवून चालक अमोल प्रकाश देशमुख यांच्याकडे रॉयल्टीबाबत विचारणा केली असता , रॉयल्टी मिळून आली नाही. यावेळी मेटॅडोर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले. चालक अमोल देशमुख यास १५४६० रुपयांचा दंड आकारण्यात आला.