धाड परिसरात अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:19+5:302021-07-07T04:43:19+5:30
मागील दोन दिवसांत धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौंढाळा आणि गुम्मी येथील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतचा एक स्वतंत्र ठराव घेऊन ...

धाड परिसरात अवैध दारू विक्री
मागील दोन दिवसांत धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौंढाळा आणि गुम्मी येथील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतचा एक स्वतंत्र ठराव घेऊन गावात चालणाऱ्या अवैध देशी दारू विक्रीसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा यांना निवेदन दिले. दारूची होणारी खुलेपणाने विक्री आणि धाड येथून गावात पोहोचणारी देशी दारू यावर येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालणे अशक्य होते. त्यामुळे गुम्मी आणि मौंढाळा येथील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या भागातील अवैध धंद्यांवर कारवाई करून प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे.
गुम्मी येथे शाळा परिसरातच दारू विक्री
बुलडाणा तालुक्यातील गुम्मी याठिकाणी देशी दारूची विक्री ही प्राथमिक शाळेच्या परिसरात करण्यात येत आहे. त्यामुळे तळीराम शाळेच्या व्हरांड्यातच दारू पिऊन तेथेच गोंधळ घालतात. त्याठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच साचलेला आहे. यावर स्थानिक पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. परिणामी ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होत आहे.