अवैध दारू पकडली; तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:47 IST2017-07-10T00:47:13+5:302017-07-10T00:47:13+5:30
मलकापूर: दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर धाड टाकत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत दारू व वाहन अंदाजे किंमत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अवैध दारू पकडली; तिघांवर कारवाई
मलकापूर: दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर धाड टाकत दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत दारू व वाहन अंदाजे किंमत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ९ जुलै रोजी रात्री १० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील नरवेल-धरणगाव रस्त्यावरील तेलखेड फाटा येथे केली.
एमएच १९ एल १००६ ही गाडी दारू वाहतूक करीत गोपनीय माहिती प्राप्त असल्याने दसरखेड पोलीस आधीच सापळा रचून तेलखेड फाट्यावर तैनात होते. या गाडीला थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता एका कंपनीचे देशी दारूचे एकूण २० बॉक्स अंदाजे किंमत ४८ हजार रुपये आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी भगवान चोपडे (वय ४७), देवा डंडोरे (वय २८) व रमेश पाटील (वय ३७) या तिघा आरोपींना ताब्यात घेत ४८ हजार रुपये किमतीची दारू तथा १ लाख रुपये किमतीचे वाहन अशा प्रकारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही धाडसी कारवाई पोनि माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रतनसिंह बोराडे, पोहेकॉ सुभाष पहुरकर, नापोका संजय निंबोळकर, प्रमोद पोलाखरे, पोकॉ आनंद माने, गोपाळ इंगळे, नीलेश तोमर, चालक राजपूत आदींनी पार पाडली.