‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:30 PM2019-11-11T14:30:48+5:302019-11-11T14:31:12+5:30

डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत २०० मिटरच्या आत अगदी रस्त्याला लागून खोदकाम होत आहे.

Illegal excavation of secondary mineral required for 'Samruddhi Highway' | ‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: समृद्धी महामार्गासाठी लागणारे गौण खनिज मिळविण्याकरीता महामार्गाच्या परिसरात जागो जागी अवैध उत्खनन करण्यात येत आहे. डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत २०० मिटरच्या आत अगदी रस्त्याला लागून खोदकाम होत आहे. हे खोदकाम शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरत असून, यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे निवेदन येथील एका शेतकरी पुत्राने तहसिलदारांमार्फत जिल्हा अधिकाºयांकडे ८ नोव्हेंबर रोजी दिले आहे.
डोणगाव येथील शेतकरी पुत्र मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी मेहकर तहसीलदारांकडे दीड महिन्या अगोदर एक निवेदन दिले होते. मनोज नव्हाळे यांच्या शेताच्या बाजूला असलेले शेत सुखदेव कोंडुजी लांभाडे यांनी समृद्धी महामार्गासाठी लागणाºया गौण खनिजासाठी दिले. मात्र त्या शेताचे मोजमाप न करताच सरळ खोदकाम सुरू केल्याने शेतात जाण्यासाठी असलेला पांदण रस्ता सुद्धा खोदून टाकला. त्यावर महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या परिसरात मोठ-मोठे खड्डे करण्यात आले आहेत. एकीकडे रस्त्या लगत २०० मिटरपर्यंत कोणतेही खोदकाम करता येत नाही, मात्र डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत ३० फुटा पेक्षा जास्त खोल खड्डा खोदण्यात आला आहे. तर आजू बाजूच्या शेतकºयाला कोणतीही माहिती न देता शेततळ्याच्या नावावर हा खड्डा खोदण्यात आला आहे. यातील गौण खनिज काढण्यासाठी ब्लास्टिंग घेतले जात आहेत. ब्लास्टिंगच्या हादरा बसल्याने काहींच्या शेतातील बोअर बंद पडल्याचे प्रकार येथे घडले आहेत. शेतालगत असलेल्या खड्यामध्ये ८ नव्हेंबर रोजी गाय पडल्याने जीव धोक्यात घालून शेतकºयांनी गायीला वाचविले. शेतकºयांसाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. काही दिवसा नंतर या खड्यांमध्ये पाणी झिरपल्याने शेत जमीनी खचू शकतात. त्यामुळे इच्छामरणाची परवानगीच मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी निवेदनाद्वारे मागितली आहे.
 

तहसिलदांराकडून पाहणी
 तहसिलदार संजय गरकळ यांनी तलाठ्यासह जाऊन डोणगाव-शेलगाव देशमुख रोडलगतच्या खोदकामाची पाहणी केली. तेंव्हा याठिकाणी असलेला मोठा खड्डा शेतकºयांसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले असतानाही त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. शेततळ्याच्या नावावर खोदकाम सुरू असल्या बाबत तहसिलदार गरकळ यांना विचारले असता त्यांनी कुठलीच माहिती दिली नाही.

Web Title: Illegal excavation of secondary mineral required for 'Samruddhi Highway'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.