मदरशांचा समावेश झाल्यास ‘शाळाबाह्य’ची संख्या वाढणार

By Admin | Updated: July 6, 2015 23:58 IST2015-07-06T23:58:48+5:302015-07-06T23:58:48+5:30

सर्वेक्षणानुसार बुलडाणा जिल्ह्यात ६६२ मुले; मदरशांची तपासणी नाहीच.

If the madrasa is included, the number of 'out-of-school' will increase | मदरशांचा समावेश झाल्यास ‘शाळाबाह्य’ची संख्या वाढणार

मदरशांचा समावेश झाल्यास ‘शाळाबाह्य’ची संख्या वाढणार

खामगाव : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त चमुने जवळपास ५ लाख ३0 हजार ७४६ कुटुंबियांना भेट देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्यामध्ये एकूण जिल्ह्यात ६६२ शाळाबाह्य मुले आढळली; मात्र या सर्वेक्षणामध्ये एकाही मदरशाचा समावेश नसल्याने जिल्ह्यात असलेल्या २२ अधिकृत मदरशांसोबतच इतर अनधिकृत मदरसे, वेदशाळा यांची संख्या गृहीत धरल्यास शाळाबाह्य मुलांची संख्या वाढणार आहे.
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली. त्यात ३0१ मुलींचा समावेश आहे.
बुलडाणा तालुक्यात एकूण २९ शाळाबाह्य मुले आढळली, त्यात २१ मुले, ८ मुली. चिखली तालुक्यात एकूण ४२, मुले २0, मुली २१. दे.राजा एकूण १२, मुले ८, मुली ४, सिं. राजा एकूण १४, मुले ७, मुली ७. लोणार ४0, मुले १९, मुली २१. मेहकर १0, मुले ४, मुली ६. खामगाव १९४, मुले ११३, मुली ८१. शेगाव ४0,मुले ३१, मुली ९. संग्रामपूर १६९, मुले ८७, मुली ८२. जळगाव जा. ३0, मुले ९ , मुली २१. नांदूरा १४, मुले ७, मुली ७. मलकापूर एकूण २१, मुले ११, मुली १0. मोताळा एकूण ४८, मुले २४ मुली २४, असे एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली आहेत.
बुलडाणा शहरात एकूण ७ शाळाबाह्य बालक आढळून आलेत, त्यात ४ मुले, ३ मुलींचा समावेश आहे. ही संख्या अधिकृतरीत्या जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असली तरी सूत्रांच्या मते ही संख्या अजूनही वाढू शकते. मदरशांचा समावेश करण्यात आल्यास ही संख्या पाच हजारापेक्षाही जास्त होण्याची भीती शिक्षणक्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

*अधिकृत २२ मदरसे
वक्फ बोर्डाकडे नोंद असलेले बुलडाणा जिल्ह्यात अधिकृत २२ मदरसे आहेत. या मदरशांमध्ये ३ हजारापर्यंत विद्यार्थी असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याशिवाय अधिकृत नोंद नसलेले मरदसेसुद्धा जिल्ह्यात आहेत.; मात्र त्याबद्दल प्रशासनाकडे माहिती नाही.

Web Title: If the madrasa is included, the number of 'out-of-school' will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.