शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

शेतकर्‍यांना १५ दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास मंत्र्यांना गावबंदी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:33 IST

चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.

ठळक मुद्देगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्नोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.चिखली तालुक्यातील गोदरी येथे काल ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते, यावेळी रविकांत तुपकर यांच्या हस्ते गोदरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन झाले. प्रारंभी रविकांत तुपकर यांचे गोदरी गावात आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गावकर्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, शासनाने सुरुवातीला सोयाबीनचे भाव पाडल्याने शेतकर्‍यांना मातीमोल भावाने आपले सोयाबीन विकावे लागले. दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील कपाशीवर बोंडअळी पडल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले, सरकारने या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. मात्न हे सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे टाकत नाही, तोपर्यंत ‘‘सरकारचे हे लबाडाचे आवतन’’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तसेच नाफेड योजना शेतकर्‍यांसाठी नसून भाजपच्या दलालांसाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतीमालाला हमीभाव व उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याची घोषणा केली; मात्न सरकारने आधी दीडपट हमी भाव व उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले; तसेच गोदरी येथील गावकर्‍यांनी माझ्यावर व माझ्या चळवळीवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे.     यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, भगवानराव मोरे, बबनराव चेके, राणा चंदण, संजय इंगळे, सतीश मोरे, मयूर बोर्डे, अजीम, नितीन राजपूत, अनिल वाकोडे, गणेश शिंगणे, गोदरीच्या सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्यु कर्‍हाडे, भागवत म्हस्के, राम अंभोरे, साजीद, संतोष परिहार, राजू मोरे, सरदारसिंग राजपूत, नवलसिंग राजपूत, छोटु झगरे, रामेश्‍वर परिहार, अमोल मोरे, नवृत्ती शेवाळे, प्रवीण राऊत, डॉ.जंजाळ, राहुल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना