विवाहितेवर बलात्कार करुन पतीचा खून
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:36:14+5:302014-08-31T00:43:43+5:30
लोणारा तालुक्यातील शारा येथे ववाहितेवर बलात्कार करुन पतीचा खून केल्याची घटना; आरोपीस अटक.

विवाहितेवर बलात्कार करुन पतीचा खून
लोणार : तालुक्यातील शारा येथील हरिहर मंदिराच्या खोलीत एका २५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करुन तिच्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान या प्रकरणी लोणार पोलिसांनी शारा येथील एका ३0 वर्षीय आरोपीस अटक केली आहे. यासंदर्भात हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील रहिवाशी भागवत कुलतांबकर (३0) हे दोन मुले व पत्नीसह गेल्या सहा महिन्यापासून लोणार तालुक्यातील शारा येथे हरिहर मंदिराच्या खोलीत राहत होते. बेल-फुले वितरणाचा त्यांचा व्यवसाय होता. दरम्यान, शेवटच्या श्रावण सोमवारला भागवत कुलतांबकर हे बेल-फुले वितरणासाठी गेले होते. यावेळी शारा येथील आरोपी संतोष श्रीराम डव्हळे (३0) याने विवाहित महिलेस एकटे पाहून तिच्या घरात घुसून तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पुन्हा सायंकाळी भागवत घरी जेवण करीत असताना त्याच्यासमोरही आरोपीने त्या विवाहितेवर जबरदस्ती केली. आणी उभय पती-पत्नीस बेदम मारहाण केली. त्यामुळे कुलतांबकर कुटुंबाने शारा येथून पळ काढला व त्यांनी लोणार बसस्थानकावर रात्र काढली. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी भागवत कुलतांबकर याचा दुर्गा टेकडी परिसरात मृतदेह आढळून आला. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी पिडीत महिलेने लोणार पोस्टेला आरोपी संतोष डव्हळे विरुद्ध बलात्कार व खून प्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.