पती, पत्नीस मारहाण, पाच जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:47+5:302021-04-05T04:30:47+5:30

नागापूर येथील विनायक वामनराव धाबे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने मेहकरवरून नागापूर येथे जात होते. गावात आल्यानंतर दुचाकीने घरी जात ...

Husband, wife beaten, five charged | पती, पत्नीस मारहाण, पाच जणांवर गुन्हे

पती, पत्नीस मारहाण, पाच जणांवर गुन्हे

नागापूर येथील विनायक वामनराव धाबे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीने मेहकरवरून नागापूर येथे जात होते. गावात आल्यानंतर दुचाकीने घरी जात असताना प्रवीण रवींद्र गायकवाड याने घरासमोर रोडवर बोरचा पाईप आडवा टाकलेला होता. तो रस्त्यावरील पाईप पाहून विनायक धाबे यांनी पाईप रोडवरून काढ, त्यावरून दुचाकी गेल्यास नुकसान होईल, असे सांगितले. दरम्यान, गायकवाडने विनायक धाबेसोबत वाद घातला व इतर मंडळी जमवून विनायक धाबेसह त्यांच्या पत्नीला मारहाण करून जखमी केले. आरोपी रवींद्र भीमराव गायकवाड व रवींद्र गजानन गायकवाड यांनी विनायक धाबे यांना चापटाबुक्यांनी मारहाण करून व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात आरोपी प्रवीण रवींद्र गायकवाड, रवींद्र भीमराव गायकवाड, सुनील भीमराव गायकवाड, समाधान भीमराव गायकवाड व रवींद्र गजानन गायकवाड यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए. एस. आय. अशोक नरोटे व बोडखे करीत आहेत.

Web Title: Husband, wife beaten, five charged