पतीने टाकले पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST2021-09-17T04:41:14+5:302021-09-17T04:41:14+5:30

फिर्यादी प्रियंका संदीप दाभाडे या रक्षाबंधन सणानिमित्त माहेरी गेल्या होत्या. ९ सप्टेंबर रोजी त्या शिरवा या गावी दुपारी तीन ...

Husband throws rat poison in wife's mouth | पतीने टाकले पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध

पतीने टाकले पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध

फिर्यादी प्रियंका संदीप दाभाडे या रक्षाबंधन सणानिमित्त माहेरी गेल्या होत्या. ९ सप्टेंबर रोजी त्या शिरवा या गावी दुपारी तीन वाजता पोहचल्या असता फिर्यादीचा पती आरोपी संदीप दाभाडे याने क्षुल्लक कारणावरून भांडण केले. यादरम्यान त्याने फिर्यादी पीडितेच्या तोंडात उंदीर मारण्याचे औषध टाकून घरातून निघून गेला. काही वेळानंतर घरी परतल्यावर पीडितेने रुग्णालयात नेण्यास सांगितले असता ‘तू नाटक करीत आहेस’ असे म्हणून टाळले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पीडितेने आई-वडिलांकडे जाऊन हकिकत सांगितल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप दाभाडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband throws rat poison in wife's mouth