शेतीच्या वादातून भावाने ब्लेडने वार करून पती पत्नीस केले जखमी
By Admin | Updated: July 17, 2017 19:02 IST2017-07-17T19:02:29+5:302017-07-17T19:02:29+5:30
धाड : शेतात तणनाशक औषधी का फवारली असे विचारले या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.

शेतीच्या वादातून भावाने ब्लेडने वार करून पती पत्नीस केले जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : शेतात तणनाशक औषधी का फवारली असे विचारले या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.
जांब येथील शरद नारायण ताठे व समाधान लक्ष्मण ताठे या दोघा भावात शेतीच्या कारणावरून जुना वाद होता. वरचेवर त्यांचे बरेचदा भांडण होत होती. आज रोजी सकाळी शरद ताठे याने आरोपी समाधान ताठे यास माझे शेतात तणनाशक औषधी का फवारली याची विचारणा केली असता आरोपीने रागाचे भरात खिशातील ब्लेडने फिर्यादी शरद ताठे याचे गालावर, डोक्यावर वार केले. दरम्यान शरद ताठेची पत्नी घटनास्थळी हजर होती. प्रकार पाहताच ती मध्ये गेली असता आरोपीने तीचेवरही ब्लेडने तोंडावर वार करून दोघांना जखमी केले. या घटनेची फिर्याद शरद ताठे यांनी धाड पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी विरूध्द कलम ३२४ भादंवी गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटील सह पोहेकाँ ओमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे हे करीत आहे.