सुलतानपूर-मेहकर मार्गावर दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 11:02 AM2020-11-16T11:02:11+5:302020-11-16T11:02:18+5:30

Buldhana Accident News अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला  पाठीमागील बाजूने जबर धडक दिली.

Husband and wife killed in two-wheeler accident on Sultanpur-Mehkar road | सुलतानपूर-मेहकर मार्गावर दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

सुलतानपूर-मेहकर मार्गावर दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर/सुलतानपूर:  गॅस सिलींडरची वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिल्याने मेहकर येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुलतानपूर-मेहकर मार्गावर घडली. दरम्यान, मृतक दांपत्य हे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला देऊळगाव वायसा येथे बहिणीकडे भेटीला गेले होते. तेथून परत येत असताना ही दुर्देवी घटना घडली.
या घटनेत मुळचे मेहकर तालुक्यातील शेंदला येथील रहिवाशी मात्र व्यवसायानिमित्त गेल्या काही वर्षापासून मेहकर येथे स्थायीक झालेले रामेश्वर सीताराम नालेगावकर (५१) आणि त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर नालेगावकर (४७) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात मेहकरनजीक असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलनजीक घडला. रामेश्वर सीताराम नालेगावकर हे कुटुंबासह मेहकरमध्येच स्थायीक झाले होते. मेहकरमधील शिक्षक कॉलनीत ते वास्तव्यास होते.  दिवाळीनिमित्त असलेल्या प्रसन्न वातावरणातच भाऊबिजेच्या पुर्वसंध्येला रामेश्वर नालेगावकर हे पत्नी भाग्यश्री नालेगावकरसह  दुचाकीवर (एमएच-२८-ऐएल-२४३६) देऊळगाव वायसा येथे बहिणीला भेटायला गेले होते.  रविवारी दुपारी परत येत असताना मेहकर-सुलतानपूर मार्गावर गॅस सिलेंडर घेवून जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला  पाठीमागील बाजूने जबर धडक दिली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच स्थानिकानी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी दत्तात्रय खटावकर यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण मांटे हे करीत आहे. या मृत पती-पत्नीच्या पश्चात  तीन मुली, नातवंड व जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान अलीकडील काळात या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात कार पुलावरून काेसळून दाेन जण ठार झाले हाेते. 

Web Title: Husband and wife killed in two-wheeler accident on Sultanpur-Mehkar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.