वडगाव तेजनजवळ अपघातात पती-पत्नी ठार
By Admin | Updated: May 2, 2017 19:04 IST2017-05-02T19:04:03+5:302017-05-02T19:04:03+5:30
लोणार- वडगाव तेजन येथे मोटारसायकलीस समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रायपूर येथील रहिवासी संजय चौथे व संगिता चौथे हे पती-पत्नी ठार झाले.

वडगाव तेजनजवळ अपघातात पती-पत्नी ठार
लोणार : तालुक्यातील वडगाव तेजन येथे मोटारसायकलीस समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी संजय चौथे व संगिता चौथे हे पती-पत्नी ठार झाले. सदर घटना २ मे रोजी सकाळी 8.30 वाजता घडली. या घटनेमुळे रायपूर गावावर शोककळा पसरली आहे.