हमालांच्या संपामुळे तुरीची हर्रासी दिवसभर बंद!

By Admin | Updated: April 18, 2017 01:01 IST2017-04-18T01:01:21+5:302017-04-18T01:01:21+5:30

शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कार्यालयाच्या काचा फोडल्या

Hura's shutdown closed due to the humana clash! | हमालांच्या संपामुळे तुरीची हर्रासी दिवसभर बंद!

हमालांच्या संपामुळे तुरीची हर्रासी दिवसभर बंद!

नांदुरा : हमालांनी रात्री व्यापाऱ्यांची तूर एफसीआयच्या पोत्यात भरताना सहा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पकडल्यानंतर बाजार समितीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली त्याचा प्रतीकार करण्यासाठी हमालांनी अचानक सोमवारी सकाळीच एफसीआय व नियमित हर्रासी बंद पाडली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी दुपारी चार वाजेदरम्यान नांदुरा-बुलडाणा रोडवर बाजार समितीसमोर बसून आंदोलन केल्याने रस्ता बंद झाला तर काही अज्ञातांनी कार्यालयातील काचा फोडल्या. अखेर पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संध्याकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एफसीआयची तूर खरेदी सुरू असून, मागील महिन्यातील २० मार्चला आलेल्या मालाची मोजणी सुरू आहे. आधीच या खरेदीत गैरव्यवहार व शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सिद्ध केल्यानंतरही ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांना व्यापाऱ्यांचा माल भरताना रंगेहात शेतकऱ्यांनी पकडले. त्यावरील तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली. आता हमाल संघटनेने यापूर्वीही १३ एप्रिलला आंदोलन करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली होती. १७ एप्रिलला हमाल संघटनेने तहसीलदार, पोलीस स्टेशन, सहायक निबंधक आदींना निवेदन देऊन त्यांनी पोलीस चौकशीत ज्यांची नावे सांगितली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे निवेदन देऊन मोजणी केलीच नाही. त्यामुळे हर्रासी व शासकीय तूर खरेदी बंद पडली. मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत तूर विक्रीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा या सर्व प्रकारामुळे संताप अनावर झाला, त्यांनी बाजार समिती अधिकारी व पदाधिकारी यांना धारेवर धरले. तुरीची आजही मोजणी होणार नाही, यामुळे संतप्त झालेले सर्व शेतकरी नांदुरा-बुलडाणा रोडवर जावून बसले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी ठप्प झाली होती. काही अज्ञातांनी बाजार समितीच्या कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्या व खुर्च्या फेकल्या. नांदुरा पोलिसांनी यावेळी संतप्त शेतकऱ्यांना २४ तासात सर्व चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवडला; मात्र चाळीस दिवसांपासून पडून असलेली तुरीची मोजणी केव्हा होणार व एफसीआयच्या खरेदीतील सावळा गोंधळ व गैरव्यवहार दाबण्याचा प्रशासन का प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा माल विकणाऱ्यांना प्रशासन का पाठीशी घालत आहेत व हे प्रकरण दाबण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, तर ग्रेडर खर्चे यांना का अभय दिल्या जाते, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांचा आहे. तुरीच्या खरेदीतील हेराफेरी व गैरव्यवहार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी व हमाल संघटनेची आहे.

शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे
एफसीआयला तूर विक्री करणारे शेतकरी मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर एफसीआयच्या तूर खरेदीतील गौडबंगाल, गैरव्यवहार व हेराफेरी पाहून ते संतप्त झाले आहेत. रात्रीच्या अंधारातील व्यापाऱ्यांची तूर खरेदीचा त्यांनी पर्दाफाश केला. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार झाली; मात्र कारवाई झाली नाही. आता हमालांनीही निवेदन देऊन कारवाईची मागणी करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली.

Web Title: Hura's shutdown closed due to the humana clash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.