खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

By Admin | Updated: May 13, 2014 22:48 IST2014-05-13T21:59:20+5:302014-05-13T22:48:16+5:30

पूर्णा नदी ते गोळेगाव जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाची सांगता आज आश्‍वासनाने सांगता करण्यात आली.

The hunger strike of the villagers to build potholes | खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण

जळगाव जामोद : पूर्णा नदी ते गोळेगाव जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत. त्यामुळे सदर खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी गोळेगाव ग्रामस्थांनी काल १२ मे पासून उपोषण सुरु केले होते. सदर उपोषणाची आज आश्‍वासनाने सांगता करण्यात आली. पूर्णा नदी ते गोळेगाव जाणार्‍या मुख्य रस्त्यात अवैधरित्या होणार्‍या रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने पूर्णा नदी ते गोळेगाव दरम्यान असणार्‍या रस्त्यामध्ये मोठे खड्डे झाले आहेत. या खड्यामध्ये ग्रामस्थ प्रकाश घोंगटे पडल्यामुळे त्यांचा पाय फॅक्चर झाला. यासर्व बाबींकडे महसूल विभागाचे लक्ष वेधून त्यावर त्वरित उपाययोजना करावी व सदर खड्डे बुजविण्यात यावे या आशयाचे निवेदन ८ मे रोजी तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आले होते. परंतु सदर निवेदनावर कार्यवाही न झाल्यामुळे १२ मे पासून गोळेगाव येथील प्रकाश कडु घोंगटे व सिध्दार्थ संपतराव इंगळे हे ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले. आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी राकाँचे जिल्हा नेते माजी आ. कृष्णराव इंगळे यांच्या आग्रही भूमिकेमुळे उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे व तहसीलदार चव्हाण यांनी सदर खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले. राकाँचे जिल्हा नेते कृष्णराव इंगळे यांनी उपोषणकर्त्यास चहा देवून या उपोषणाची यशस्वी सांगता केली. यावेळी माजी सभापती प्रवीण भोपळे, नगरसेवक सखाराम ताडे, वासुदेवराव भोपळे, अनिल गव्हांदे, राजेश राजपूत, शेख जावेद, समद जहागिरदार, गजानन बोदडे, रामदास इंगळे, देशमुख, पांडुरंग भोपळे, ज्ञानदेव राजनकर, संतोष दाभाडे यांची उपस्थिती होती.

Web Title: The hunger strike of the villagers to build potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.