नांदुरा कृउबासचा त्रिशंकू निकाल

By Admin | Updated: June 2, 2015 02:21 IST2015-06-02T02:21:12+5:302015-06-02T02:21:12+5:30

शेतकरी प्रगती पॅनलचे आठ, परिवर्तन पॅनलचे सहा तर शेतकरी विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी.

Hunger hung from Nandura Corubus | नांदुरा कृउबासचा त्रिशंकू निकाल

नांदुरा कृउबासचा त्रिशंकू निकाल

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्याच्या सहकार क्षेत्राला मागील दोन महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल १ जूनच्या दुपारी जाहीर झाले. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी व भारिप प्रणीत शेतकरी प्रगती पॅनलचे आठ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलचे सहा तर शिवसेना प्रणीत शेतकरी विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले. मतदारांनी स्पष्ट एका पॅनलला बहुमत न दिल्याने तसेच माजी सभापती विलासराव पाटील व उपसभापती सुगदेव कवळकार यांचा पराभव झाल्याने हे निकाल धक्कादायक ठरले आहेत.
नांदुरा कृउबासच्या अठरा जागांसाठी ३१ मे रोजी मतदान झाले होते. तर मतमोजणी १ जून रोजी झाली. या निवडणुकीत मुख्य चुरस तीन पॅनलमध्ये होती. यामध्ये काँग्रेसच्या शेतकरी परिवर्तन पॅनलचे पंधरापैकी सहा, शेतकरी विकास पॅनलचे सोळा पैकी चार उमेदवार विजयी झाले. सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात जागांसाठी ६0१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये गावंडे जनार्दन (३३२), चोपडे बलदेवराव नामदेवराव (३२३), धांडे भगवान नारायण (२९५), चोपडे बलदेवराव वसंतराव रामभाऊ (२८३), पाटील मोहन भिकाजी (२६७), गावंडे राजेश सोपान (२४७) व राजपूत विजयसिंग खुमानसिंग (२४५) हे विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या महिला मतदार संघातील दोन जागांसाठी ६0१ मतदारांनी मतदान केले. यात मुंढे वंदना संतोष (३२१) व जुनारे केशरबाई वासुदेव (२४५) विजयी झाल्या. सेवा सहकारी इतर मागासवर्गीय मतदार संघातील एका जागेसाठी ६0३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये हेलगे प्रदीप एकनाथ (२३७) हे विजयी झाले. सेवा सहकारी भटक्या व विमुक्त जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ६0३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये फासे साहेबराव प्रल्हाद (२३४) मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातील दोन जागांसाठी ४९५ मतदान झाले. यामध्ये भगत निळकंठ भाऊराव (१९८) व शिंगोटे अनिल मधुकर (१९४) हे विजयी झाले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातील एका जागेसाठी ४९४ मतदान झाले. यामध्ये दामोधर बाळु रुपाजी (१७१) विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थीक दुर्बल घटक मतदार संघातील एका जागेसाठी ४९५ मतदान झाले. यामध्ये ताठे गणेश रामराव (१८३) मते घेऊन विजयी झाले. व्यापारी मतदारसंघातून डागा राजेश चेतनदास (११२) व खंडलेवाल जुगलकिशोर मदनलाल (९८) हे विजयी झाले. हमाल मापारी मतदार संघातील एका जागेसाठी २८0 मतदान झाले, यामध्ये फणसे संजय श्रीकृष्ण (२३५) मते घेऊन विजयी झाले.

Web Title: Hunger hung from Nandura Corubus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.