शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जगदंबा माता यात्रा महोत्सवाची सांगता, भादोला येथे शेकडो वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:14 AM

भादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती. 

ठळक मुद्दे हजारो भाविकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती.  येथे जगदंबा माता यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने पाच दिवस साजरा केला जातो. दिवाळीपेक्षाही या उत्सवाला गावात अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे बाहेरगावी कामानिमित्त, नोकरीनिमित्त असलेले सर्व जण या उत्सवाला गावी येतात. गावातील मुलीदेखील या उत्सवासाठी सासरवरून माहेरी परततात. रंगपंचमीपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २ मार्चला सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गावात रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. २ ते ६ मार्च दरम्यान विविध कार्यक्रम पार पडले. मंगळवार, ६ मार्च रोजी मंदिरावर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी देवीला शेंदूर चढविण्यात आला, तर रात्री गावातून दफड्यांच्या निनादात देवीचे ताट काढण्यात आले. या उत्सवाचा प्रमुख सोहळा असलेली देवीची शोभायात्रा ७ मार्च रोजी निघाली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही शोभायात्रा दुपारी ४ वाजता संपली. विनोद अंबादास ठेंग यांना यावर्षीचा देवीचा मान मिळाला होता. सदर शोभायात्रेत सहभागी होण्यासह दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा