अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी शेकडो अर्ज

By Admin | Updated: August 29, 2014 00:06 IST2014-08-29T00:06:26+5:302014-08-29T00:06:47+5:30

मातोळा व खामगाव तालुक्यातील अतिरिक्त अंगणवाडी सेविके च्या पदासांठी शेकडो अर्ज दाखल झालेत.

Hundreds of applications for additional services to the anganwadi | अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी शेकडो अर्ज

अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी शेकडो अर्ज

मोताळा/खामगाव : मातोळा व खामगाव तालुक्यातील अतिरिक्त अंगणवाडी सेविके च्या पदासांठी शेकडो अर्ज दाखल झालेत.

मातोळा तालुक्यातील १0५ गावांधील २२0 अंगणवाडी अतिरिक्त सेविकेसाठी जवळपास एक हजार अर्ज दाखल करण्यात आले.
योजना पुनर्रचना व बळकटीकरण अतंर्गत कार्यरतअंगणवाडी केंद्रासाठी अतिरिक्त सेविका अर्थात दुसरी कार्यकर्ता मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तालयाने घेतल्या नंतर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये अतिरिक्त सेविकांची अर्ज दाखल करण्यासाठी २८ ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. या योजनेसाठी राज्यातील २0 जिल्हय़ांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली. त्यात बुलडाणा जिल्हय़ाचा समावेश असल्याने त्याअंतर्गत एकात्मीक बालविकास सेवा योजना कार्यालय पं.स.मोताळा यांनी तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्राकरीता स्थानिक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्याची गुरूवारी अंतिम मुदत होती. त्यामुळे महिलांनी तालुका कार्यालयात मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील २२0 जागांसाठी १0५ गावांमधील ९८५ महिलांनी आज शेवटच्या दिवसापर्यंत एकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकार्‍याकडे अर्ज केले आहे.
अतिरिक्त सेविका ही मानधन तत्वावर कें द्रशासनाकडून देय असलेल्या अनुदानावर तात्पुरत्या स्वरूपात नेमली जाणार आहे. त्यांची निवड कोणत्याही निवड समितीकडून केली जाणार नाही.केवळ पात्रतेच्या अटीनुसार गुणवत्ता व इतर नैसर्गिक गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या पदासाठी किमान १0 वी पासची अट ठेवण्यात आली आहे. तसेच स्थानिक रहिवासी असावी, २१ ते ३0 वर्ष वयोगटातील आणि दोन जिवंत अपत्यांपेक्षा जास्त अपत्य नसली पाहिजेत असेही स्प्ष्ट करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत खामगाव तालुक्यात भरल्या जाणार्‍या अंगणवाडी सेविकांच्या २४0 जागांसाठी आज २८ ऑगस्ट या शेवटच्या दिवशीपर्यंत अंदाजे १४00 जणांनी अर्ज दाखल केले आहे. आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी होवून सुमारे ८00 महिला व युवतींनी अर्ज केले.
महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर १, मेहकर २, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात एकूण २५७७ अंगणवाडींवर अतिरिक्त अंगणवाडी सेविका (दुसरी कार्यकर्ती) नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये खामगाव तालुक्यात २४0 अतिरिक्त अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. आज अर्ज करण्याची शेवटची दिनांक असल्याने महिलांची एकच गर्दी झाली होती. यामुळे रात्री उशीरापर्यंत हजर असणार्‍यांचे अर्ज स्विकारण्यात आले, अशी माहिती खामगाव पं.स.चे गटविकास अधिकारी प्रकाश वाघ यांनी दिली.

Web Title: Hundreds of applications for additional services to the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.