शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाला वारसा वृक्षाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 20:26 IST

Status of a heritage tree : शंभर वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाला वारसा वृक्षाचा दर्जा

जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडपाणी या भागात शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वडाच्या झाडाला महाराष्ट्र शासनाकडून वारसा वृक्षाचा दर्जा मिळाला असून गुरुवारी वटपौर्णिमेच्या पर्वावर मान्यवर महिलांच्या हस्ते या वृक्षाचे पूजन करण्यात आले. भविष्यात या वारसा वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी तरुणाई फाउंडेशनने स्वीकारली आहे.    सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, सामाजिक वनीकरण अधिकारी स्मिता राजहंस,तरुणाई फाउंडेशनचे उमाकांत कांडेकर, मानद वन्यजीव रक्षक सदस्य मनजीतसिंग,लोकमत सखी मंचच्या वंदना कांडलकर,माजी सरपंच विजया पाटील, माजी नगर सेविका लताताई तायडे , सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, डॉ.नंदूभाऊ तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिलांच्या हस्ते या वारसा वटवृक्षाचे पूजन करण्यात आले.सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या वारसा वृक्षाच्या फलकाचे अनावरण उपविभागीय महसूल अधिकारी यांनी केले.या वटवृक्षाची गोलाई 25 मीटर असून या वटवृक्षाला भविष्यात कोणीही तोडणार नाही याची दखल सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने घेतली जाणार आहे.     महाराष्ट्र शासनाने शंभर वर्षे व त्यापेक्षा जुन्या वृक्षाचे जतन करून त्यांना वारसा वृक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने सामाजिक वनीकरण अधिकारी स्मिता राजहंस यांनी तालुक्यातील वडपाणी येथील या वृक्षाचे नाव शासन दरबारी पाठविले आणि त्या वटवृक्षाला वटपौर्णिमेच्या पर्वावर वारसा वृक्षाचा दर्जा देण्यात आला. या वारसा वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी तरुणाई फाउंडेशनने स्वीकारली आहे. या प्रसंगी माजी सरपंच पुंडलिक पाटील, लता उमरकर, डी.एस. देशमुख, अमोल धवसे यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोद