श्रद्धेय बाबूजींना विनम्र अभिवादन

By Admin | Updated: July 3, 2017 01:15 IST2017-07-03T00:51:10+5:302017-07-03T01:15:33+5:30

बुलडाणा: स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी लोकमत कार्यालयात विनम्र अभिवादन केले.

Humble greetings to the revered babuji | श्रद्धेय बाबूजींना विनम्र अभिवादन

श्रद्धेय बाबूजींना विनम्र अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला रविवारी जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी लोकमत कार्यालयात पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन सोहळा संगम चौकस्थित लोकमत कार्यालयात पार पडला. यावेळी बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, काँग्रेसचे सरचिटणीस संजय राठोड, जि.प. सदस्य जयश्री शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, डॉ. नारायण अंभोरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी बाबूजींना पुष्ण अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिवसभर बुलडाणा तथा मेहकर कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबूजींना अभिवादन केले.

Web Title: Humble greetings to the revered babuji