शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘सेवा’ हे अनिवार्य कार्य: मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 13:31 IST

‘सेवा’ कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे  प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

ठळक मुद्देश्री सदगुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्यावतीने शैक्षणिक संकुलातील वसतीगृहाच्या उद्घाटन प्रंसगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.भय्यूजींच्या प्रेरणा आणि आशीवार्दाने सुरू असलेल्या या कार्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सेवा’ हे अनिवार्य कार्य: मोहन भागवतलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:   आपण तरूण इतरांना तारणे हेच खºया संतांचे लक्षण आहे. भय्यूजी महाराजांनी वंचितांच्या सेवेसाठी आपले जीवन खर्ची घातले.  सजनपुरी येथे सेवेचे तीर्थक्षेत्र निर्माण केले. या तीर्थक्षेत्रात अनेकजण स्रानकरून पवित्र होताहेत. ‘सेवा’ कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे  प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे शुक्रवारी श्री सदगुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्यावतीने शैक्षणिक संकुलातील वसतीगृहाच्या उद्घाटन प्रंसगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून अमनोरा एस्स फांऊडेशनचे अध्यक्ष अनिरूध्द देशमुख, विदर्भ प्रातांचे सह संघचालक चंद्रशेखर राठी,  भय्यूजी महाराजांच्या धर्मपत्नी डॉ. आयुषी देशमुख, प्रशांत देशमुख, माधुरी देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, धर्म हा उन्नत करणारा असून, धर्माचे काम जोडण्याचे आहे. सेवेच्या माध्यमातून सेवा करणारा पवित्र होतो. खरी सेवा ही अंहकारमुक्त सेवा असून, सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रम शाळेत  पवित्र सेवाकार्य सुरू आहे. वंचिताच्या या सेवाकार्यासाठी समाजाने संवेदनशील होवून पुढे आलं पाहीजे. या सेवाकार्यात जमत नसेल तर, जसे जमेल तशी सेवा केली पाहीजे. भय्यूजींच्या प्रेरणा आणि आशीवार्दाने सुरू असलेल्या या कार्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे, मलकापूर मतदार संघाचे आ. चैनसुख संचेती, खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डवरे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, सागर फुंडकर, ह.भ.प लक्ष्मीनारायण दायमा महाराज, प.पू. दिडेमामा, प्रकाश देशमुख, सतीश राठी, विजय देशपांडे, महादेवराव भोजने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिरूध्द देशपांडे यांनी केले. यावेळी माधुरी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी सरसंघचालकांच्या हस्ते संदीप बावडेकर, योगेश साधवानी, अभिजीत कुंटे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विवेक कुळकर्णी यांनी केले. आभार मुख्याध्यापक सोमनाथ गोरे यांनी मानले. 

टॅग्स :khamgaonखामगावMohan Bhagwatमोहन भागवतBhayyuji Maharajभय्यूजी महाराज