मानव विकास मिशनची बससेवा सुरु

By Admin | Updated: August 5, 2014 22:32 IST2014-08-05T22:32:05+5:302014-08-05T22:32:05+5:30

या मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे झाले आहे.

Human development mission bus service started | मानव विकास मिशनची बससेवा सुरु

मानव विकास मिशनची बससेवा सुरु

साखरखेर्डा : मेहकर येथून साखरखेर्डा करीता १ ऑगस्टपासून मानवविकास मिशनची बससेवा सुरु झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोयीचे झाले आहे.
यापूर्वी सकाळी ७ वाजता साखरखेर्डा येथे येण्यासाठी मेहकरवरुन एकही एस.टी. बस नव्हती. त्यामुळे परिसरातील वरोडी, गुंज, सावंगीमाळी, सावंगीवीर, सावंगीभगत येथील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे तात्काळ बस सुरु करावी, अशी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी आगारप्रमुख पाथरकर यांच्याकडे मागणी केली असता १ ऑगस्टपासून मेहकर येथून साखरखेर्डा बस सुरु करण्यात आली. बस प्रारंभवेळी जि.प.सदस्य दिनकरराव देशमुख, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, अनिल तुपकर, गजानन तुपकर यांनी वाहक व चालकाचा सत्कार केला. मेहकर येथून सकाळी ६ वाजता सदर बस निघत असून, यामुळे नागपूर येथून येणार्‍या प्रवाशांचीही सोय झाली आहे.

Web Title: Human development mission bus service started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.