स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मानवी साखळी
By Admin | Updated: January 12, 2016 02:04 IST2016-01-12T02:04:15+5:302016-01-12T02:04:15+5:30
'बेटी बचाओ' अभियानास खामगावात झाला शुभारंभ.

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मानवी साखळी
खामगाव : वाढत्या स्त्री भूणहत्या रोखण्यासोबतच या विषयावर जनमानसात जागृती व्हावी, या दृष्टिकोणातून केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ह्यबेटी बचाओ- बेटी पढाओह्ण या उपक्रमास खामगाव शहरात जिजाऊ जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर प्रारंभ झाला. दरम्यान, यानिमित्त शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवत 'बेटी बचाओ'चा नारा बुलंद केला.
शहरातील शिवाजी पुतळा ते फरशीपर्यंत विद्यार्थ्यांनी ही मानवी साखळी बनविली होती. त्यामुळे खामगावकरांचे ही मानवी साखळी एक आकर्षण बनली होती.
सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते यावेळी हिरवी झेंडी दाखवून ही मानवी साखळी बनविण्यात आली. या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा संयोजिका अनिता देशमुख, शहर संयोजिका आरती गोडबोले, जान्हवी कुळकर्णी, शिवाणी कुळकर्णी, नेहा मेहरा, रेखा मुळीक, रेखा जाधव, बहुरुपे काकू, किशोर भोसले, राजेंद्र धनोकार, पंकज गणे, सय्यद अकबर, विजय महाले प्रामुख्याने उपस्थित होते.
या अभियानात शहरातील जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा, ए. के. नॅशनल हायस्कूल, अंजूमन हायस्कूल, जी. एस. कॉलेज, शिंगणे विद्यालय, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटसह अन्य शहरातील शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या अभियानात सहभागी न झालेल्या शहरातील काही शाळांवर प्रसंगी कारवाई केली जाण्याचे संकेतही मिळत आहेत.