चिमुकल्यांचे पोषण कसे होणार ?
By Admin | Updated: December 10, 2014 00:17 IST2014-12-10T00:17:15+5:302014-12-10T00:17:15+5:30
चिखली तालुक्यातील अंगणवाडी बालकांना निकृष्ट पोषण आहार प्रकरण.

चिमुकल्यांचे पोषण कसे होणार ?
सुधीर चेके पाटील / चिखली
ग्रामीण भागातील सहा वष्रे पर्यंंतच्या गोरगरीबांच्या बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मार्फत अंगणवाडी केंद्रे चालविल्या जातात. या अंगणवाडी केंद्रात निकृष्ट पोषण आहाराचा पुरवठा करून काही ठेकेदार भ्रष्टाचार करीत आहेत. अशा भ्रष्टाचार्यांचा शोध घेवून त्यांच्यावर राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्याकडून अशा भ्रष्टाचार्यांवर कारवाईचा आसूड ओढला जाणार का? असा सवाल या बालकांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे. चिखली तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांवर शिक्षणाचा ङ्म्रीगणेशा गिरविणार्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील बालकांना द्यावयाच्या पुरक पोषण आहारातील कडधान्य कुजके निघाल्याच्या तक्रारी आल्यानंतर याप्रकरणाची पडताळणी केली असता तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी केंद्रावर पुरविण्यात आलेल्या मटकी, हरबरा, डाळ, चवळी या धान्यांना किड लागलेली आढळून आली. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, स्थानिक पत्रकार यांनी तक्रारकर्त्यासह पाहणी केली असता, हे कडधान्य अक्षरश: जनावरेही खाणार नाहीत अशा स्थितीत आढळून आले. याबाबत सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनीही प्रत्यक्ष धान्याची पाहणी करून ही कडधान्ये निकृष्ट असल्याचे मान्य करून याबाबत विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे सुतोवाच केले होते. तर जिल्हय़ातील माध्यमांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून या पोषण आहार योजनेचा पंचनामा होत असताना जिल्हय़ातील वरीष्ठ अधिकार्यांकडून मात्र, या प्रकरणाबाबत मौन पाळले जात आहे, यावरून संबंधीत योजनेचा पुरवठादार आणि संबंधीत वरिष्ठ अधिकारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध या कारवाईच्या आड येत असावेत, असा कयास तक्रारकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.