खामगाव पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:14 IST2019-11-29T15:14:05+5:302019-11-29T15:14:18+5:30
पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून पालिका पदाधिकारी कपडे धुवायला लावत असल्याचा व्हीडीओ गुरूवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

खामगाव पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे!
खामगाव : स्थानिक नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांकडून नगर पालिका पदाधिकारी घरगुती कामे करवून घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून पालिका पदाधिकारी कपडे धुवायला लावत असल्याचा व्हीडीओ गुरूवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव पालिकेसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव पालिकेतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये कर्तव्यावर असलेल्या एका सफाई कामगाराने नगर पालिकेत पदाधिकाºयाच्या घरी कपडे धुत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. गुरूवारी सकाळी हा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये राकेश बहुनिया नामक सफाई कामगार चादर धुत असल्याचे स्पष्ट दिसत असून, त्यानेच चादर धुण्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर पालिकेत सफाई कामगार म्हणून ड्युटी लावण्यासाठी आपणाकडून नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून खासगी कामे करवून घेतल्या जात असल्याचा आरोप ‘सोशल’ माध्यमामध्ये केला. (प्रतिनिधी)
राजकीय स्पर्धेतून हा व्हीडीओ तयार करण्यात आला असावा. आपणाकडून अथवा आपल्या परिवारातील सदस्यांकडून कोणत्याही सफाई कामगाराला खासगी काम सांगण्यात आले नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या घरचा नाही.
-पवन गरड
पाणी पुरवठा सभापती यांचे पुत्र, नगरपरिषद खामगाव.