घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:40+5:302021-09-27T04:37:40+5:30
फिर्यादी राजेश नानाराव पवार (४० रा. व्यंकटेशनगर) हे भोकरदन येथे पशुधन पर्यवेक्षक (व्हेटर्नरी डाॅक्टर) म्हणून नोकरी करतात. ...

घर फोडून ७३ हजारांचा ऐवज लंपास
फिर्यादी राजेश नानाराव पवार (४० रा. व्यंकटेशनगर) हे भोकरदन येथे पशुधन पर्यवेक्षक (व्हेटर्नरी डाॅक्टर) म्हणून नोकरी करतात. २३ सप्टेंबर रोजी भोकरदन येथे ड्यूटीवर असताना येथील व्यंकटेशनगर येथील घरामध्ये रात्री ११ वाजेदरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटामधील पर्समध्ये असलेले दागिने, सोन्याचा गोफ (किंमत ३० हजार), अंगठी ८ ग्रॅम (किंमत १० हजार), अंगठी ५ ग्रॅम (किंमत ५ हजार) व नगदी १६ हजार रुपये, तर दुसऱ्या बेडरूममध्ये टेबलवर ठेवलेला लॅपटॉप (किंमत १२ हजार), असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.