शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण

By अनिल गवई | Updated: May 9, 2024 16:45 IST

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

अनिल गवई, खामगाव: घराच्या हिस्सेवाटीचा वाद विकोपाला गेल्याने मुलासह सुनेने एका ५५ वर्षीय वृध्देला जबर मारहाण केल्याची घटना बाळापूर फैलात बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, मंदाबाई दादाराव सोनोने या रात्री घरी असताना आरोपी कपिल हा दारासमोर आला. शिविगाळ करीत केस ओढले. खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तक्रारदार महिलेचा पती आणि मुलगी आवरण्यास गेली असता, त्यांनाही मारहाण केली. घराच्या हिस्सेवाटणीवरून मुलगा आणि सुनेकडून सतत त्रास देत, शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी पती पत्नी  विरोधात शहर पोलीसांनी भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ रामेश्वर फासे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस