घराला आग लागून ४0 हजारांचे नुकसान
By Admin | Updated: July 13, 2015 01:08 IST2015-07-13T01:08:34+5:302015-07-13T01:08:34+5:30
खामगाव शहरातील घटना.

घराला आग लागून ४0 हजारांचे नुकसान
खामगाव : शहरातील रेखा प्लॉट भागातील एका घराला रात्री १२ वाजतादरम्यान अचानक आग लागली. या आगीत घरगुती साहित्यासह ४0 हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या. शहरातील रेखा प्लॉट भागात राजा भगवान आठवले यांचे घर आहे. रात्री १२ वाजता घरातील इलेक्ट्रिक वायरिंगचा शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीत घरातील अलमारी, फॅन, मिक्सर, फ्रीज, भांडे, कपडे व महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य जळून खाक झाले.