शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘टायगर कॉरिडॉर’च्या आशा पल्लवित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 16:28 IST

बुलडाणा: मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यादरम्यान वाघांच्या मुक्त संचारासाठी ‘टायगर कॉरिडॉर’चा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या दुधलगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे निदर्शनास आल्याने टायगर कॉरिडॉरच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

- नीलेश जोशीबुलडाणा: मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यादरम्यान वाघांच्या मुक्त संचारासाठी ‘टायगर कॉरिडॉर’चा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या दुधलगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे निदर्शनास आल्याने टायगर कॉरिडॉरच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.सध्या दुधलगाव शिवारात वाघ बघितल्याची पुष्टी परिसरातील अनेक नागरिक करीत असल्याने अखेर वन विभागाने या भागात चार ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाच्या पायाचे ठसे आणि कॅमेऱ्यात वाघ ट्रॅप झाल्यानंतर याची खºया अर्थाने पुष्टी होणार असली, तरी मुक्ताईनगर आणि वढोदा वनक्षेत्रातून वाघाचा या क्षेत्रात मुक्त संचार असल्याच्या बाबीला आता पुष्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळात बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात जवळपास दोन वाघ असल्याची पुष्टी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हा एक भाग असला, तरी मध्य प्रदेशातील सिपनापासून ते अंबाबरवा अभयारण्यापर्यंत वाघांचा कॉरिडॉर असल्याचे स्पष्ट झालेले आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आला तर मेळघाट, बुलडाणा, जळगाव, यावल, वढोदा, मुक्ताईनगर आणि अनेरडॅम या भागातील ६२ हजार ८३९ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र वाघांसाठी सुरक्षित राहू शकते.

दुधलगावातील वाघ भ्रमंतीवर?दुधलगाव परिसरात वाघ असल्याचे नागरिक सांगत असले, तरी प्रत्यक्षात ट्रॅप कॅमेºयात तो जोवर येत नाही, तोवर त्याच्या या भागातील अस्तित्वावर शिक्कामोर्तब होणार नाही; मात्र वन विभागाला मिळालेले ठसे हे वाघाच्या ठशांशी साधर्म्य दाखविणारे आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर भागातून हा वाघ पूर्णा नदी ओलांडून या भागात आला असावा, असा कयास व्यक्त करण्यास शंका आहे. तो सध्या या कॉरिडॉरमधून पास होत असावा, त्यामुळे या भागात त्याचे अस्तित्व आढळल्यासही तो १५ ते २० दिवसांच्यावर येथे राहणे शक्य नसल्याचेही वन विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTigerवाघwildlifeवन्यजीव