कोरोना योद्धा म्हणून वायाळ यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:19+5:302021-08-20T04:40:19+5:30
ऊमरा देशमुख हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळअंतर्गत येते. येथे वसंत वायाळ हे माजी सैनिक असून, त्यांनी देशाची ...

कोरोना योद्धा म्हणून वायाळ यांचा सत्कार
ऊमरा देशमुख हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र, जानेफळअंतर्गत येते. येथे वसंत वायाळ हे माजी सैनिक असून, त्यांनी देशाची सेवा केल्यानंतरसुद्धा परत जनतेच्या सेवेसाठी आरोग्य विभागात आरोग्यसेवक पदावर रुजू झाले. येथे त्यांनी चार वर्षे सेवा दिली. त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगावअंतर्गत उपकेंद्र गोहोगाव (दां.) येथे त्यांची बदली झाली आहे. दरम्यान, ऊमरा देशमुख येथे वायाळ यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक भागवतराव देशमुख, उपसरपंच नारायण देशमुख, मिलिंद खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजाबराव देशमुख होते. कार्यक्रमाला जीवन वानखेडे, मधुकर नाईक, गणेश देशमुख, समाधान वानखेडे, जगदीश देशमुख, जीवन डोळस, बब्बू भाई व ग्रामस्थ उपस्थित होते. देशभक्तीपर गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता झाली.