नोकराने परस्पर विकला शेतमाल
By Admin | Updated: May 9, 2015 01:49 IST2015-05-09T01:49:53+5:302015-05-09T01:49:53+5:30
मेहकर तालुक्यातील घटना.

नोकराने परस्पर विकला शेतमाल
डोणगाव : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे १0 वर्षांपासून घरात नियमित काम करीत असलेल्या एका नोकराने मालकाला न सांगता ९४ हजार रुपयांचा शेतमाल परस्पर विकला. ही घटना ८ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकरावर गुन्हा दाखल केला आहे. शेलगाव देशमुख येथील संतोष केशव धाडकर यांच्या घरी गावातीलच प्रकाश मुरलीधर पांढरे हा दहा वर्षांपासून नोकर म्हणून काम करीत होता. प्रकाश घरातील सर्व काम करीत असल्यामुळे तो घरच्या मंडळीचा विश्वासू झाला होता; मात्र दरम्यान प्रकाश मुरलीधर पांढरे याने संतोष धाडकर यांची संमती न घेता. त्यांच्या शेतातील ३६ क्विंटल सोयाबीन व ११ क्विंटल हरभरे अंदाजे किंमत ९४ हजार रुपयांचा शेतीमाल परस्पर विक्री केला. घरात ठेवलेला शेतमाल गायब झाल्याचे लक्षात येताच, यासंदर्भात संतोष धाडकर यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रकाश पांढरे व आणखी एक जणाविरुद्ध कलम ४0६, ४0८, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.