बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची बुलढाण्यात होळी
By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 21, 2023 18:00 IST2023-09-21T17:59:20+5:302023-09-21T18:00:13+5:30
बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करून शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले.

बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची बुलढाण्यात होळी
देऊळगाव राजा : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेऊन विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी विविध विभागातील रिक्त पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरणाऱ्या शासन निर्णयाची होळी देऊळगाव राजा बस स्थानक परिसरात २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करून शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले. अन्याय कारक शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड, शहर अध्यक्ष विष्णू झोरे, सेवादलचे अध्यक्ष गजानन तिडके, सुभाष दराडे, इक्बाल कोटकर, हनिफ भाई, इस्माइल बागवान, नासिर, प्रा. अशोक डोईफोडे, राजू नाडे, गजानन अवसरमल, मधुकर तांबे, रामदास डोईफोडे, सूर्याजी चव्हाण, लक्ष्मण कवळे, निखील जायभाये, रफिक, शेख महंमद, शेख शहजाद तथा काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.