शासनाच्या परिपत्रकाची खामगावात होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 19:27 IST2017-06-17T19:27:07+5:302017-06-17T19:27:07+5:30
शिवसेना, स्वाभीमानीचा सहभाग.

शासनाच्या परिपत्रकाची खामगावात होळी
>लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकर्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकर्याची दिशाभूल करणार्या शासनाच्या परित्रकाची शनिवारी खामगावात होळी करण्यात आली. शिवसेना आणि स्वाभीमानीच्या पदाधिकार्यांनी एकत्र येत, उप विभागीय कार्यालयासमोर परित्रकाची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल अमलकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, गिरधर देशमुख, बाबा काळे,सोपान खंडारे, सुधीर सुर्वे, संजय अवथळे, शिवसेना शहर प्रमुख सुनील अग्रवाल,राहुल कलमकार यांच्यासह शिवसेना स्वाभीमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.