शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

हिवरा आश्रम परिसर बनला पर्यटकांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 11:48 IST

Hivara Ashram premises became a tourist attraction : मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम हे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र व क दर्जाचे पर्यटन क्षेत्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

हिवरा आश्रम (बुलडाणा): मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम हे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र व क दर्जाचे पर्यटन क्षेत्र आहे. विवेकानंद आश्रम संस्थेने बालाजी व शिव मंदिर परिसरात म्हणजेच हरिहर तीर्थक्षेत्र या रमणीय ठिकाणी आकर्षक गार्डनची निर्मिती केली आहे. सध्या हा परिसर पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरत आहे.

 अंदाजे दीड ते दोन एकर परिसरात सुंदर फुलांची व शोभेची झाडे, कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी, घसरगुंडी, झोपाळा, हरिण, वाघ, छोटा भीम, डोरेमॉन यांच्या प्रतिमा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. अखंड वाहणारी जलधारा, लागूनच तलाव, भगवान बालाजी, शिवाची भव्य देखणी प्रतिमा दुसऱ्या बाजूला गाय, वासरांची गर्दी असलेली गो शाळा, मंदिरातून ऐकू येणारी प्रार्थना हे सर्व मनाला आनंद देणारे घटक पर्यटकांना खेचून घेत आहेत. आश्रमाच्या दक्षिण दिशेला असलेल्या कोराडी धरणातील सहा एकर बेटावर शेकडो नारळाची झाडे, चोहोबाजूंनी निळेशार पाणी व सुमारे वीस फूट उंचीची स्वामी विवेकानंदांची तेजस्वी मूर्ती माणसाला अंतर्मुख करते. सोबतीला बोटीचा आनंददायी प्रवास आणि हिवरा आश्रमाचा प्रसिध्द पेढा मनाचा गोडवा वाढविते.

नैराश्य आलेल्यांना आनंद

लॉकडाऊनच्या काळात नैराश्य आलेल्या, तसेच कामाच्या व्यापात जीवनाकडे दुर्लक्ष झाल्याने आलेल्या ताणतणावात ही स्थळे नागरिकांना आनंदी करत असतात. संस्थेने या दोन्ही ठिकाणच्या विकासकामांसाठी स्वतः पुढाकार घेऊन लाखो रूपये खर्चूनही स्थळे निर्माण केली आहे.

पर्यटकांचा ओढा वाढला

हिवराआश्रमचा परिसरातील पर्यटन केंद्र सर्वांचे लक्ष वेधत आहे. येथे पर्यटकांची हजेरी आता वाढली आहे. जिल्हा व जिल्ह्याबाहेर असंख्य भाविक, पर्यटक या ठिकाणी भेट देत असल्यामुळे संस्थेने मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे केंद्र मोफत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी निवास व भोजनाची व्यवस्था सुध्दा असल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधानाची भावना आहे.

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणाtourismपर्यटन