क्षुल्लक कारणास्तव विक्रेत्यास मारहाण
By Admin | Updated: March 21, 2017 01:48 IST2017-03-21T01:48:38+5:302017-03-21T01:48:38+5:30
पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मारहाण.

क्षुल्लक कारणास्तव विक्रेत्यास मारहाण
बुलडाणा, दि. २0- पैसे दिले नाही म्हणून येथील रामनगर परिसरातील एक भेलपुरी विक्रेत्यास मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री १0 वाजता घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पप्पुपुरी संधुपुरी गोसामी वय ३0 रा.रामनगर यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, स्थानिक बाल शिवाजी कॉव्हेंटसमोर असलेल्या मोकळ्या जागेत दररोज सायंकाळी दहा ते बारा भेलविक्रीच्या गाड्या लावण्यात येतात. या भेलविक्रेत्यांना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी शंकर शेळके अधिक एक यांनी पैसे मागितले; मात्र यावेळी गोसामी यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्यास मारहाण केली. त्यामुळे गोसामी यास गंभीर जखमी अवस्थेत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले. याप्रकरणी गोसामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.